Skip to content
Menu

Science that Actually Works

house

वास्तुशास्त्र  हे हजारो वर्षापासून अस्तीत्वात असलेले भारतीय शास्त्र आहे. सध्या खूप लोकांनी वास्तुशास्त्राला “वस्तु” शास्त्र  बनवलय. थोडक्यात वास्तुशास्त्राला पिरयामिड, रत्ने , यंत्रे इ. वस्तु विकायचा व्यवसाय बनवलय. कोणतीही बाह्य वस्तु न लावता केवळ आतील रचना बदलून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदे मिळवून घ्यायला येतात. तसेच कोणत्याही प्रकारच्या तोडफोडीची गरज पडत नाही. अगदी राहते घर, फ्लॅट, बंगला वास्तुशास्त्रानुसार बॅलेन्स करून मोठे फायदे मिळविता येतात.
नवीन बांधकामासाठी तर कॉलम काढण्याची सुरुवात करण्यापासून राहायला जाईपर्यंत मार्गदर्शन मिळते.  ते ठरलेल्या मुदतीत व ठरलेल्या बजेटमध्ये पूर्ण होते. रिनोव्हेशनसाठी तर खूपच मोठा फायदा होतो. खूप लोकांनी चुकीच्या पद्धतीने रिंनोव्हेशन केल्यामुळे प्रॉब्लेम्स वाढलेत. आधी नसलेल्या समस्या रिंनोव्हेशंन नंतर निर्माण झालेल्या आहेत. फर्निचर, पेंट, सजावट यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.

सध्या खूप लोकांनी वास्तुशास्त्राप्रमाणे घरे बांधलीत, तरीपण त्यांना पूर्णपणे फायदे मिळत नाहीत, असे का होते… यासाठी सखोल मार्गदर्शन मिळेल. काही ठराविक समस्या उदा. दुखणी, वाद-विवाद, ताणतणाव, स्ट्रगल इ. साठी वास्तुशास्त्रीय दृष्ट्या असलेली मुळ कारणे जाणून घ्या. व त्याचे निवारण करा. वास्तुतील काही चांगल्या भागाचा वापर कसा करावा यासाठी मार्गदर्शन मिळेल. अगदी भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये देखील याचा फायदा करून घेता येतो. व्यावसायिक वास्तु बॅलेन्स करून व्यवसाय वाढवा. घर स्वतचे असो, भाड्याचे असो, एक रूम असो किंवा मोठा फ्लॅट/बंगलो असो, त्या वास्तुचे आपल्यावर परिणाम होतच असतात. यामध्ये आवश्यक ते बदल करून आपल्याला हवे असलेले फायदे / परिणाम सहजरीत्या मिळविता येतात. निसर्गातील पंचतत्वांची आपल्या घरात योग्य प्रकारे रचना करून जीवन सुसह्य बनवा.